
सस्नेह नमस्कार
बृहन्महाराष्ट्र मंडळाचे १५ वे अधिवेशन शिकागो येथे करायचे ठरले आहे. आपल्या सर्वांचे अधिवेशनाच्या संकेत स्थळावर (web site) स्वागत करताना अतिशय आनंद होत आहे . शिकागो शहर बृहन महाराष्ट्र मंडळाच्या दृष्टीने एक ऐतिहासिक शहर आहे कारण १९८१ मध्ये मंडळाची स्थापना शिकागो येथे झाली. मंडळाचे पहिले अधिवेशन १९८४ मध्ये शिकागोलाच संपन्न झाले. २०११ साली जगाच्या कानाकोपऱ्यातून मराठी मंडळी येथे एकत्र जमतील, मराठी संस्कृतीचा मनसोक्त आस्वाद घेतील. मित्रमैत्रिणींच्या भेटीगाठी होतील आणि शिकागोच्या मंडळाचा पाहुणचार घेतील. अधिवेशनाच्या तयारीला जोरदार सुरवात झाली आहे. बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अधिवेशन हा जागतिक मराठी समाजाचा मानबिंदू आहे. आपण सर्वजण त्यात सहभागी व्हाल अशी आशा आहे. अधिवेशनाच्या या संकेत स्थळाला वेळोवेळी भेट देत राहा म्हणजे कामाची प्रगती आपल्याला कळेल. आपले कृपाभिलाषी, बृ.म.म.अधिवेशन समिती. |


BMM Convention Committee (BCC)
On behalf of the BCC, we welcome you to our 15th National Convention. Maharashtra Mandal Chicago will host the BMM 2011 Convention in the month of July. Each of the committee members is working diligently to make the upcoming event one of the best organized conventions. We will strive to offer a culturally rich experience to all attendees. Please register early and encourage your family and friends to do so as well. Please visit this site periodically to follow our progress.
Thank you and we look forward to meeting you in Chicago.


Our Team
|









