
Founder's Message
सप्रेम नमस्कार, वि. वि.
जुलै २०११ ला होण्या-या पंधराव्या अधिवेशनानिमित्त अखिल मराठी समाजाला महाराष्ट्र मंडळ, शिकागो, अगत्याने निमंत्रित करीत आहे.
माय मराठीची हाक, साद तिच्या लेकरांना
BMM चा प्रतिसाद, भेटीगाठी संवादांना!
१९८४ साली मराठी मायेच्या हाकेला दाद देण्यासाठी BMMने आपल्या सा-यांसाठी पहिले अधिवेशन शिकागोला भरविले होते. त्यावेळी जिव्हाळ्याने हजर असलेल्या लोकांच्या उत्साहाने पुढील अधिवेशने भरली, लोकांनी दाद दिली. मराठी मायेचा उर भरून आला. तोच जिव्हाळा, तोच आपलेपणा घेऊन पुन्हा एकदा अधिवेशनाच्या जन्मस्थळी आपल्या सर्वांचा संगम जुळवूया.. संगम उगमापाशी! तुमच्या सहकार्याशिवाय हे कसे घडेल? आपणच तर या कार्याचे उत्सवमूर्ती. आपण सगळ्यांनी मिळून गुण गाउया आपल्या प्रिय मराठीचे.
या तुम्ही या अधिवेशना... संगम घडवू उगमापाशी, जुळवू नाती मायेनिशी कसे घडावे तुम्हांविना? या हो या अधिवेशना...
अधिवेशन आहे जुलै २०११ मध्ये. तेव्हा या संकेतस्थळाला वरचेवर भेट द्यायला विसरू नका. तोपर्यंतच्या सगळ्या तयारीची अद्यावत माहिती तुम्हाला कळायलाच हवी की! पूर्वरंग चुकवून कसे चालेल?
मग नक्की भेटू या पंधराव्या अधिवेशनात. आपल्यातील उद्योजक, शास्त्रज्ञ, कलावंत, लेखक, संगणकतज्ञ, आणि अनेक वैशिष्ठ्ये असलेली आपली ही सामुदायिक शक्ती उत्तर अमेरिकेत उल्लेखनीय ठरेल, असा आलेख निर्माण करू या.
नका विसरू संकेत भेटण्याचा करू एकीने सन्मान मराठीचा!
-जया हुपरीकर,
संस्थापक, बृहन्महाराष्ट्रमंडळ, उत्तर अमेरिका






