
शिकागो येथे भरणाऱ्या BMM 2011 अधिवेशनाविषयी विशेष दिलचस्पी दर्शवल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार! शिकागोवासियांच्या खास मराठमोळ्या आदरातिथ्याचा आस्वाद घेण्यासाठी आपण या अधिवेशनाला जरूर उपस्थित राहाल अशी आशा नव्हे तर खात्रीच आहे. अधिवेशन स्थळाची सजावट आणि स्वयंसेवकांची आपुलकी आपले शिकागोतले वास्तव्य नक्कीच आनंददायी करतील आशी आम्ही ग्वाही देतो.
संगीत, नाट्य, नृत्यकला या करमणुकीच्या, तसेच चर्चासत्रे, भाषणे वगैरे सर्व दर्जेदार कार्यक्रमांनी सजलेले हे अधिवेशन आपणापुढे सादर करण्यात आम्हाला अतिशय आनंद होणार आहे. पण कार्यक्रमांची भाऊगर्दी न करता, तुम्हाला इतरही महत्त्वाच्या गोष्टींसाठी म्हणजे गप्पा-टप्पा आणि जुन्या मैत्रींना उजाळा देता देता नवे स्नेहबंध जुळवण्याला वेळ मिळेल याची आम्ही दक्षता घेत आहोत. शिवाय सर्वांसाठी उत्तम भोजन व रुचकर उपाहाराची चोख व्यवस्था असेलच हे सांगणे नलगे! अधिवेशनानंतर सागरासमान असलेल्या मिशिगन महासरोवराच्या काठावर वसलेल्या शिकागोतल्या विविध प्रेक्षणीय स्थळांना भेट देणे आपल्याला सहज शक्य होईल
स्वागत समितीचे सर्व सदस्य आपली आतुरतेने वाट पाहत आहेत. मग ठरलं तर, जुलै २०११ मध्ये शिकागोच्या अधिवेशनाला यायचं! आम्ही आपली वाट पाहतोय.


Welcome and Hospitality Committee
We thank you for your interest in the BMM 2011 convention in Chicago. We hope that you will decide to attend and enjoy the convention while basking in our warm medley of Midwestern and Maharashtrian hospitality. As members of the Hospitality Committee, we are committed to making your overall experience enjoyable and memorable.
We have planned a wide spectrum of entertainment, social and educational programs for you. The venue for the convention is the McCormick Place on Chicago’s scenic lake front. You will be able to enjoy music and drama programs in the famed Arie Crown Theatre which provides an excellent view of the stage from each seat with superior acoustics. Between the programs you will have ample opportunity to socialize, meet old friends and make new ones.
For those of you who want to venture beyond the borders of the convention, Chicago offers many sightseeing choices: Willis (formerly Sears) and Hancock Towers, Millennium Park, Navy Pier, Art Institute, Field Museum, Museum of Science & Industry, Shedd Aquarium, Adler Planetarium --- the options are endless. All these places are within a short cab ride from McCormick Place. More information about sightseeing will be made available as we get closer to the convention.
So make a date with us next July. We look forward to welcoming you to the BMM 2011 Convention in Chicago.
![]() |


Our Team
|






