
बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या १५ व्या अधिवेशनाची स्वयंसेवक समिती आपले सहर्ष स्वागत करत आहे! १९८४ साली शिकागोला झालेल्या पहिल्या अधिवेशनानंतर पुन्हा एकदा हे अधिवेशन शिकागोला भरत आहे ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. अधिवेशनाला उपस्थित राहणाऱ्या सर्व मराठी बांधवांचे यथोचित आदरातिथ्य व्हावे आणि त्यांना अधिवेशनाचा आनंद मनमुराद लुटता यावा ह्या साठी कार्यरत असलेल्या सर्व स्वयंसेवकांची ही समिती आहे. अधिवेशनाकरता सुमारे अठरा विविध प्रकारच्या कार्यकारी समितींची स्थापना करण्यात आली आहे. ह्या सर्व समितींचे कार्य सुरळीतपणे पार पाडण्यासाठी, त्यांना स्वयंसेवकांची लागणारी गरज लक्षात घेऊन आमच्या समितीने शिकागोतल्या दोनशेहून अधिक उत्साही बंधूभगिनींची नियुक्ती करण्याचे श्रेय संपादन केले आहे. दोन वर्षाहून अधिक काळ चालणाऱ्या ह्या कार्याची धुरा एकजुटीने आणि समर्थपणे वाहण्याची कठीण जबाबदारी आम्हा सर्वांवर आहे ह्याची आम्हाला पूर्णपणे जाणीव आहे. स्वयंसेवकांना योग्य ते प्रोत्साहन आणि मार्गदर्शन करायला आम्ही कटिबद्ध आहोत. अधिवेशनाच्या चार दिवसांमध्ये आम्हाला केवळ शिकागोतलेच नाही तर इतर गावांमधून अधिवेशनाला येणारे बांधव देखील मदत करतील अशी खात्री आहे. अधिवेशनाच्या नावनोंदणी बरोबरच तुम्हा सर्वांना अधिवेशनाचे स्वयंसेवक म्हणून काम करण्याची संधी आम्ही देणार आहोत. आपण सर्वांनी "एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ" ह्या भावनेने आम्हाला आपली बहुमूल्य मदत उपलब्ध करून द्यावी अशी नम्र विनंती करीत आहोत. बरंय तर मंडळी, अधिवेशनासाठी आपण सर्वजण सहकुटुंब सहपरिवार यावे हे आग्रहाचे निमंत्रण!


Human Resources Committee
"Volunteers do not necessarily have the time, they just have the heart"
-Elizabeth Andrew
On behalf of the Volunteer and Human Resources Committee, we would like to welcome all of you to Chicago for the 2011 BMM Convention.
The BMM convention is a fun-filled and memorable event. We are expecting over 4,000 people from North America and across the world to attend this grand function. We have a group of over two hundred volunteers working in eighteen different committees. Volunteers are the most important resource for any organized activity.
Our Mission Statement: Together we can do it!
Our Objective: To provide volunteer support for all committees throughout the convention process and to create proper balance in utilization of volunteer resources for a successful convention.
Five plus One Principles for our Success
- We are committed to offering an enjoyable experience and hospitality to every attendee. Let's be generous and accommodate all the attendees’ needs.
- Let's encourage and respect every volunteer's contribution.
- Be kind and considerate to each volunteer. We are all working hard to make this convention successful.
- All ideas will be respected
- Every idea or desire cannot be fulfilled and decisions taken may not always please every individual. Let's keep our faith and trust in fair play intact and accept the decisions with grace and make this convention a grand success.
- Although we do the impossible immediately, miracles may take a little longer!
All of our volunteers are committed to making the BMM 2011 Chicago convention a great success. Please accept our invitation and attend the convention.


Our Team
|





