BMM

Convention Dates: July 21st to July 24th 2011
Venue: McCormick Place (Lakeside Center), Chicago, IL

MMC
spacer






Remit To India


Vascon


spacer
spacer

President's Message

Madhuri Joshi

नमस्कार बंधू भगिनींनो,
बृहन्महाराष्ट्र मंडळाचे १५ वे अधिवेशन शिकागो येथे करायचे ठरले आहे. आपल्या सर्वांचे अधिवेशनाच्या संकेत स्थळावर (web site) स्वागत करताना मला अतिशय आनंद होतोय. शिकागो शहर बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या दृष्टीने एक ऐतिहासिक शहर आहे कारण १९८१ मध्ये मंडळाची स्थापना शिकागो येथे झाली. २०११ साली जगातल्या कानाकोपऱ्यातून मराठी मंडळी येथे एकत्र जमतील, मराठी संस्कृतीचा मनसोक्त आस्वाद घेतील. मित्रमैत्रिणींच्या भेटीगाठी होतील आणि सर्वजण शिकागोच्या मंडळाचा पाहुणचार घेतील. अधिवेशनाच्या तयारीला जोरदार सुरवात झाली आहे. बृहन्महाराष्ट्र मंडळाचे द्वैवार्षिक अधिवेशन हा जागतिक मराठी समाजाचा मानबिंदू आहे. आपण सारे त्यात सहभागी व्हाल अशी मी आशा व्यक्त करते. अधिवेशनाच्या या संकेत स्थळाला वेळोवेळी भेट देत राहा म्हणजे कामाची प्रगती आपल्याला कळेल.

सौ. माधुरी जोशी
अध्यक्षा, बृहन्महाराष्ट्र मंडळ - उत्तर अमेरिका

spacer
spacer
spacer