BMM

Convention Dates: July 21st to July 24th 2011
Venue: McCormick Place (Lakeside Center), Chicago, IL

MMC
spacer
सस्नेह नमस्कार

उत्तर अमेरिकेतील बृहनमहाराष्ट्र मंडळाचे १५ वे अधिवेशन पुढील वर्षी शिकागो येथे २१-२४ जुलै २०११ दरम्यान आयोजले आहे. अधिवेशनाला येण्याचं इंडिया प्रोग्रॅम कमिटीच्या तर्फे तुम्हाला हे आग्रहाचं आमंत्रण!

महाराष्ट्रातून येणारे दर्जेदार मनोरंजनाचे कार्यक्रम हे तर अधिवेशनाचे खास आकर्षण! परंपरेला अनुसरून शिकागोच्या अधिवेशनात सुद्धा दर्जेदार मनोरंजन अपेक्षित आहे आणि ते पुरवण्यासाठी आमची कमिटी कटीबद्ध आहे.

आम्ही आणणार आहोत दर्जेदार नाटकं, ताज्या टवटवीत संकल्पनेवर आधारित नृत्य, काव्य, आणि गाण्याच्या मैफिली! तुमची भेट घडवणार आहोत जुन्या भावविश्वात घेउन जाणाऱ्या, दिग्गजांशी, मनोरंजक, उपयुक्त माहिती देणाऱ्या वक्त्यांशी आणि परिसंवाद घडवणाऱ्या अभ्यासू जनांशी! तुम्ही ऐकणार आहात तरुणाईला प्रेरित करणारे विचार आणि पहाणार आहात आगळे वेगळे आणि खुसखुशीत एकपात्री आविष्कार. तुमच्या भेटीला येणार आहेत नाट्यसंगीत, शास्त्रीय संगीत सादर करणारे अभिजात कलाकार! आणि पावलं थिरकायला लावणारे फ्यूजन अदाकार.

साहित्य, क्रिडा, संशोधन, मनोरंजन अश्या अनेक महत्वाच्या क्षेत्रात आपल्या कामगिरीचा ठसा उमटवणाऱ्या अनेक नामवंत मराठी गुणिजनांना आमंत्रित करायचा आमचा मानस आहे. आगळं-वेगळं, "हट-के" पण निर्भेळ मनोरंजन पुरवायचा आमचा इरादा पक्का आहे. वाट पहात आहोत तुमच्या पाठिंब्याची आणि प्रत्यक्ष उपस्थितीची! जसे कार्यक्रम नक्की केले जातील तसे आमच्या वेबसाईटवर घोषित केले जातील. तेव्हा आमच्या वेबसाइट्ला वरचेवर भेट द्या ही विनंती. मग जुलै २०११ मध्ये नक्की शिकागोत भेटूयात!

कळावे लोभ आहेच, तो वाढावा हि विनंती!
इंडिया प्रोग्रॅम कमिटी
spacer
spacer

India Program Committee (IPC)

The IPC would like to extend a warm welcome to all the convention attendees.


Quality entertainment programs by professional artists from Maharashtra have always been a major attraction during past conventions. Keeping with this tradition, we are committed to providing a high standard of excellence in our programs.

We plan to bring a variety of contemporary and traditional Marathi plays and music. The Convention will also showcase great speakers, famed poets, eminent writers, accomplished singers and talented dancers. Attendees will have the privilege to meet celebrated Marathi dignitaries who have made a significant impact in the fields of sports, literature, science, medicine and public service.

See you all in Chicago!

spacer
spacer

Our Team

Kalpana Nimkar
Chair
Vrunda Karmarkar
Co-Chair
Anita Chande
Anu Rajadhyax
Mugdha Deo
Gaurav Kale
Hrigveda Phansalkar
Sandeep Pawar
Pradeep Popale
Shweta Gaitonde
Smita Bennur
Subhash Deodhar
Suresh B. Talathi
Suhas Tambe
Uma Dighe
Ashok Lele
Finance Link
Mansee Joshi
HR Link
Vivek Vaishampayan
IT Link
Niteen Joshi
CSC Link
spacer