
बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या २०११ मध्ये शिकागो येथे संपन्न होणाऱ्या अधिवेशनासाठी आपले हार्दिक स्वागत. आपण सर्वांनी बहु संख्येने उपस्थित राहावे अशी Registration committee तर्फे सर्व मराठी भाषिकांना नम्र विनंती.
मराठी माणूस हा संस्कृतीचा, कलेचा भोक्ता आहे. नवनवीन कार्यक्रमांचा रसास्वाद घेण्याची त्याला ओढ आहे. हे लक्षात घेऊन शिकागोची कार्यकारिणी जोमाने आणि उत्साहाने कामाला लागली आहे. पण याला तुमच्या उपस्थितीची अत्यंत आवश्यकता आहे. हे कार्य पार पाडण्यासाठी, "श्री" ची कृपा जेवढी महत्वाची तद्वत आपली उपस्थिती सुद्धा महत्वाची आहे.
जानेवारी २०११ मध्ये अधिवेशनाची नाव नोंदणी सुरु होईल. लवकरात लवकर नोंदणी करा आणि आपल्या बरोबर आपल्या मित्रांना पण नोंदणी करायला सांगा. म्हणजे सर्वाना एकत्र बसून कार्यक्रमांचा आस्वाद घेता येईल. अधिवेशनासाठी उपलब्ध असलेल्या सभागृहाच्या मर्यादित आसन क्षमतेमुळे (सुमारे ४०००) जेवढी लवकर नोंदणी कराल तेवढा निराशेचा प्रसंग टाळू शकाल. आपण या कार्यासाठी देणगी देऊन आपली राखीव जागा आधीच पटकावू शकता. यासाठी आमची Donation Packages बघा. सढळ हाताने या कार्याला हातभार लावाल अशी आशा आहे.
Registration Committee चे सर्व सदस्य आपल्या सेवेसाठी सिद्ध आहेत. अधिवेशनाच्या नावनोंदणी संबंधी आपल्या सर्व प्रश्नांना वेळेवर आणि योग्य उत्तरे देण्याचा आमचा प्रांजळ प्रयत्न असेल अशी आम्ही तुम्हा सर्वांना खात्री देतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना अधिवेशनाला येण्याचं आग्रहाचं आमंत्रण.
आपले कृपाभिलाषी,
Registration Committee सदस्य


Registration Committee
We welcome you to the BMM 2011 Chicago Convention. We hope to facilitate a smooth registration process for all attendees.
The online registration for BMM Convention, Business conference and CME will open on Jan 14, 2011. To secure your seat we recommend that you register early. We urge you to register as a group with your family and friends so that all of you can enjoy the convention together.
Individual donation packages have been specially designed to include early registration with preferred seating. Seats will be assigned according to the donation category on a first come first serve basis. Please take advantage of this opportunity.
Please see the various donation packages we are offering for additional benefits.
We wish to see all of you with family and friends at the Windy City in July 2011.


Our Team
|





